कोथुर्णे गावच्या हद्दीत आढळून आला गळफास घेतलेल्या महिलेचा मृतदेह…

0
525

मावळ दि. 20: मावळातील मौजे कोथूर्ने गावच्या हद्दीत वाघजाई ता.मावळ जि.पुणे येथील शेत जमीन गट नंबर 678 मध्ये 35 – 40 वयाच्या अज्ञात महिलेने झाडाला साडीने गळफास घेतल्याची घटना आज सकाळी 8:45 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

कोथुर्णे गावच्या हद्दीत वाघजाई येथील आंब्याच्या झाडाला एक महिला वय अंदाजे 35 ते 40 वर्ष (नाव पत्ता समजून येत नाही ) अंगात गुलाबी रंगाची साडी ब्लाउज,पायात पैजण,जोडवे असलेले अशा वर्णनाची महिला साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत मिळून आलेली आहे. तरी सदर वर्णनाची महिला आपल्या परिसरातील, ओळखीची तसेच इतर पोलिस स्टेशन वरील रेकॉर्डवर मिसिंग असल्यास तात्काळ कामशेत पोलीस स्टेशन येथे संपर्क साधण्याचे आवाहन कामशेत पोलीस स्टेशन कडून करण्यात आले आहे.

सदर घटनेचा पुढील तपास कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक समीर शेख करत आहेत.