Saturday, October 1, 2022
Homeपुणेतळेगावखंडणी न दिल्याने दुकानदाराला मारहाण करणाऱ्या चार आरोपींना तळेगाव दाभाडे पोलिसांकडून अटक...

खंडणी न दिल्याने दुकानदाराला मारहाण करणाऱ्या चार आरोपींना तळेगाव दाभाडे पोलिसांकडून अटक !

तळेगाव दाभाडे : खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे तळेगाव दाभाडे येथे दुकानदाराला मारहाण करत जबरदस्तीने खिशातील 5 हजार रुपये हिसकावून नेल्याची घटना बुधवार दि . 27 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास शिवाजी चौकात घडली .

याप्रकरणी जय उर्फ कीटक प्रवीण भालेराव ( वय 18 , रा . तळेगाव दाभाडे ) , कुमार सुरेश मोहिते ( वय 19 , रा . तळेगाव दाभाडे ) , हर्ष प्रमोद साठे ( वय 19 , रा . वराळे , ता . मावळ ) व अनिल सुरेश मोहिते ( वय 21 , रा . समता कॉलनी , तळेगाव दाभाडे ) या चौघांना अटक करण्यात आली आहे.याबाबत हरीश पप्पू शर्मा ( वय 24 , रा . तळेगाव दाभाडे ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी यांचे तळेगाव दाभाडे येथील शिवाजी चौकात आईसक्रीमचे दुकान आहे . बुधवारी रात्री 11 वाजता आरोपी फिर्यादी यांच्याकडे दुकानात आले आणि आरोपींनी हप्त्याची मागणी केली . हप्ता न दिल्याने आरोपींनी दुकानातील वस्तूंची तोडफोड करून कामगारांना मारहाण केली . तसेच फिर्यादीच्या खिशातील र 5 हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले . सदरहून पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून तळेगाव दाभाडे पोलीस पुढिल तपास करत आहेत .

- Advertisment -

You cannot copy content of this page