Monday, July 22, 2024
Homeपुणेखंडाळा- आषाढीचा सोहळा: श्री संत रोहिदास दिंडी चा स्वागत व सत्कार सोहळा...

खंडाळा- आषाढीचा सोहळा: श्री संत रोहिदास दिंडी चा स्वागत व सत्कार सोहळा संपन्न..

लोणावळा : (प्रतिनिधी श्रावणी कामत) खंडाळा येथे आषाढीचा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. श्री संत रोहिदास दिंडीचे वारकरी मुंबई ते पंढरपूर पायी यात्रेत सहभागी झाले होते. दि. २५ जून २०२४ रोजी खंडाळा येथील रोहिदास वाड्यात विश्रांतीसाठी आले असता त्यांचे संत रोहिदास तरुण मंडळाने स्वागत व सत्कार केले. वारकऱ्यांच्या जेवणाची वेवस्था देखील करण्यात आली होती.
रोहिदास वाड्यात नुकताच वाढदिवस साजरा झाला तसेच आजींचा सन्मान करण्यात आला. १० वी आणि १२ वी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला. ज्ञात अज्ञात निधन झालेल्या समाज बांधव-भगिनींना श्रद्धांजली अर्पण करून कीर्तन करण्यात आले.
इंडियन स्काऊट अँड गाईड लोणावळा गिल्ड तर्फे स्व. सुमन बाई शिवराम फाटक यांच्या स्मरणार्थ वारकऱ्यांना औषधं वाटप करण्यात आले. या प्रसंगी गिल्डच्या अध्यक्षा रत्नप्रभा गायकवाड, सदस्य शशिकांत भोसले, श्रावणी कामत आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन श्री सुरेश गायकवाड यांनी केले.
या वेळी प्रमुख पाहुणे विणेकरी महादेव पाटील, मृदूंगाचार्य सुरेश अंभोरे, चोपदार प्रभाकर खाडे, मल्हारी पाटील, तुळसवली छबूबाई पवार, हांडेवाली गजराबाई खोमणे, कीर्तनकार ह. भ. प. नारायण पाटील, ईश्वर नांगरे उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page