
खोपोली : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटातील किमी 38/700 जवळ आज सकाळी एक कंटेनर पुलावरून खाली कोसळून भीषण अपघात झाला.
सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी दोन जण जखमी झाले आहेत . दोन्ही जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हालविण्यात आले आहे .
पुलावरून कंटेनर खाली पडल्याने केबिनचा चक्काचूर झाला आहे . अपघाताची माहिती समजताच महामार्ग पोलीस तसेच देवदूत यंत्रणा घटनास्थळी दाखल होत त्यांनी केबिनमधून जखमींना बाहेर काढत उपचारासाठी दाखल केले आहे.