खंडाळा घाटात द्रुतगती मार्गावर शिवशाही बस जळून खाक ,30 प्रवासी सुखरूप बचावले !

0
112

खंडाळा : मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटात शिवशाही बसने अचानक पेट घेतल्याची दुर्घटना शनिवार दि.30 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली.

बसला लागलेल्या या भीषण आगीत सुदैवाने कसलीही जीवीत हानी झालेली नसून बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. दरम्यान या अपघातामुळे काही काळ द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती .

मिळालेल्या माहितीनुसार मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटात मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या शिवशाही बसला रात्री 10 च्या सुमारास अचानक आग लागली . या भीषण आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली आहे . या बसमध्ये एकूण 30 प्रवासी होते . मात्र , सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही . दरम्यान या अपघातामुळे काही काळ द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही .

वेळीच आग लागल्याचे लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली . रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. बसला आग लागल्यानंतर चालकाने ही बस रस्त्याच्या कडेला उभी केली . त्यामुळे बसमधील प्रवाशी खाली उतरले . अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल होत्या.