खंडाळा बाजारपेठेत अवैध दारू विक्री सुरुच…प्रशासनाचा काना डोळा !

0
908

लोणावळा : खंडाळा बाजारपेठेत लाखो रुपयाची बेकायदेशीर दारू विक्री होत असल्याच्या अनेक घटना नागरिकांकडून उघड होत आहेत,

कोणत्याही प्रशासनाच्या परवानगी शिवाय खंडाळा मुख्य बाजारपेठेत दोन ठिकाणी दारू विक्री जोमाने सुरु असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. ही बेकायदेशीर दारू रहदारीच्या वस्तीत विक्री होत असल्याने याठिकाणी दिवसभर व रात्री अपरात्री दारू घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांमुळे येथील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.त्यासाठी पोलीस प्रशासनाकडे मदत मागायला जावे तर भीती वाटते असेही काही रहिवाशांनी स्पष्ट केले आहे.

तसेच याठिकाणी विक्री होणारी दारू बनावट असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.याची सखोल चौकशी प्रशासनाने करावी,

लोणावळा पोलीस प्रशासनाकडून अनेक वेळा या अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली परंतु कारवाई झाली की दुसऱ्या दिवशी पुन्हा दारू विक्री राजरोसपणे सुरु असते ,त्यामुळे पोलीस फक्त दिखाव्या साठी कारवाई करत असल्याची चर्चा सुरु आहे,या दारू विक्रेत्यांवर व यामध्ये कोणी सहभागी असल्यास कारवाई करून कायम स्वरूपी हे अवैध धंदे बंद करावेत,महिन्याला लाखो रुपयांची विकली जाणारी बेकायदेशीर दारुमुळे शासनाचाही महसूल बुडत आहे,या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर खंडाळा पोलीस स्टेशन असून पोलीस या अवैध दारू विक्रेत्यांकडे जाणीवपूर्वक काना डोळा करत असल्याच्या उलट सुलट चर्चा परिसरात सुरु आहेत .

लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे नवीन पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांनी काही महिन्यांपूर्वीच कार्यभार सांभाळला असल्यामुळे त्यांना या बेकायदेशीर धंद्याबद्दल माहिती नसावी अशी शंका व्यक्त केली जात आहे.

खंडाळा येथे होणारी अवैध दारू विक्री, यांना बनावट प्रकारची दारू कोण पुरवत आहे व यामध्ये इतर कोणी सहभागी असेल तर याची चौकशी करण्यात यावी व हे धंदे कारवाई करून कायमचे हद्दपार करावेत, तसेच हे अवैध धंदे कुणाच्या आशीर्वादाने सुरु आहेत याचीही चौकशी करून कारवाई करण्यात यावी,जर स्थानिक पोलीसच या अवैध धंद्यावाल्यांना अभय देत असेल तर उच्च स्तरावर या प्रकरणाची तक्रार करण्यात येईल असे मत खंडाळा रहिवाशी व्यक्त करत आहेत.

तसेच डी वाय एस पी राजेंद्र पाटील व एस पी डॉ अभिनव देशमुख साहेबांनी स्वतः याकडे लक्ष घालून हे अवैध धंदे कायम स्वरूपी हद्द पार करावेत व येथील सुज्ञ रहिवाशांना मोकळा श्वास घेण्याची संधी मिळवून दयावी अशी कळकळीची विनंती खंडाळा येथील रहिवाशी करत आहेत.