खंडाळा महामार्गावर कंटेनर पलटी होऊन प्रवासी रिक्षाला धडक दिल्याने भीषण अपघात..

0
780

खंडाळा दि.1: जुन्या मुंबई – पुणे महामार्गावर पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथे आज भीषण अपघात झाला आहे . आज सकाळी 8:15 च्या सुमारास हा अपघात झाला आहे .

भरधाव कंटेनरच्या चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर वळणावर पलटी झाला आणि 15 ते 20 फूट दूर फरफटत गेला . या अपघातात कंटेनरने रिक्षाला जोरदार धडक दिली . या भीषण अपघाताचा अंगावर काटा आणणारा सीसीटीव्ही समोर आला आहे .या अपघातात कंटेनर चालक सुखरूप बचावला तर रिक्षातील प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना लोणावळ्यातील परमार हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हा कंटेनर पलटी होताच पुणे मुंबई महामार्गावरील लेन कटिंग करत 15 फूट घसरून पलटी झाला . यावेळी मोठा आवाज झाला . अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक दुकानदार आणि लोणावळा शहर पोलीस दाखल होत अपघातग्रस्त वाहने बाजूला घेण्यात आली आहेत .