खंडाळा (मावळ) : भैरवनाथ जेष्ठ नागरिक संघ खंडाळा यांचा आज आठवा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला.
वर्धापन दिनानिमित्त शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खंडाळा विभाग प्रमुख मंगेश मारुती येवले यांच्या वतीने खंडाळ्यातील भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघातील दर महा 5 जेष्ठ नागरिकांचा औषधाचा खर्च मंगेश येवले करणार असून संपुर्ण भैरवनाथ जेष्ठ नागरिक संघ खंडाळा पूर्णपणे आजार मुक्त करण्याचा संकल्प मंगेश येवले यांनी घेतला आहे.
भैरवनाथ जेष्ठ नागरिक संघ खंडाळा यांच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमात मंगेश येवले यांनी भैरवनाथ जेष्ठ नागरिक संघातील जेष्ठ नागरिकांना त्यांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी मदतीचा हात पुढे करत त्यासाठी धनादेश सुपूर्द करण्यात आला.
यावेळी खंडाळा गावातील जेष्ठ शिक्षक,माजी नगरसेवक व भैरवनाथ जेष्ठ नागरिक संघ खंडाळा यांचे सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.