खंडाळा येथे मॉकड्रिल साठी सर्व आपत्ती यंत्रणा तात्काळ दाखल,वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मॉक ड्रिल संपन्न…

0
49

लोणावळा दि. 22: खंडाळा या ठिकाणी मॉक ड्रिल घेण्यात आली. सदर ठिकाणी घातपाताणी अथवा इतर कारणाने आग लागल्यानंतर तात्काळ पुर्तता करून उपाययोजना करता यावी या अनुशंगाने सदर ठिकाणी आग लागली की त्यावर कसे नियंत्रण करावे याबाबत ही मॉक ड्रिल घेण्यात आली.

सकाळी 11:15 ते 1:15 यादरम्यान घेण्यात आलेल्या मॉक ड्रिलसाठी लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण, कामशेत पोलीस स्टेशन, वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच लोणावळा नगर परिषदेचे व HPCL कंपनीचे अग्निशमन वाहन,रुग्णवाहिका स्टाफ इत्यादी यंत्रणा सदर मॉक ड्रिल ठिकाणी सहभागी झाल्या.

सदर मॉक ड्रिलसाठी लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सीताराम डुबल, सहाय्यक पोलीस निरीक्षक बावकर, पोलीस उपनिरीक्षक मुजावर व 27 पोलीस अमलदार, होमगार्ड,वार्डन व त्याचबरोबर लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे आणि 10 पोलीस अमलदार, तसेच कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय जगताप व 5 पोलीस अमलदार आणि वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव व 3 अमलदार असे सर्व एकुन 6 पोलीस अधिकारी व 50 पोलीस अमलदार, होमगार्ड वार्डन तसेच लोणावळा नगर परिषदेचे अग्निशमन वाहन व स्टाफ , HPCL कंपनीचे सुरक्षा रक्षक अधिकारी विवेक दिनकर, अग्निशमन वाहन व स्टाफ, रुग्णवाहिका व स्टाफ सर्व साहित्यासह सहभागी होते.