Sunday, September 24, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडखडई आणि करंबेली ठाकूरवाडी ग्रामस्थांची प्रशासनाची बैठक संपन्न..

खडई आणि करंबेली ठाकूरवाडी ग्रामस्थांची प्रशासनाची बैठक संपन्न..

प्रतिनिधी ( दत्तात्रय शेडगे)
खालापूर तालुक्यातील करंबेली ठाकूरवाडी आणि खडई धनगरवाडा यांच्या रस्त्यासाठी प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यासोबत आज महत्त्वाची बैठक संपन्न झाली.या बैठकीत उजलोली ते खडई धनगरवाडा रस्ता करण्याचा निर्णय घेण्यात आला तर या या रस्त्याचा सर्व्ह करून ग्रामस्थांची संमती घेण्याचे ठरले, तर येत्या आठ दिवसांत त्या ग्रामस्थांची बैठक लावून सर्व्ह करण्याचा निर्णय घेण्यात आला.


यावेळी रायगड जिल्हा परिषद सदस्य नरेश पाटील, माजी रायगड जिल्हापरिषद उपाध्यक्ष रघुनाथ भाई शिंदे, बंधकाम विभागाचे अधिकारी बारदस्तकर, सभापती वृषाली पाटील, उपसभापती विश्वनाथ पाटील, पंचायत समिती सदस्य उत्तम प्रबलकर, गटविकास अधिकारी बालाजी पुरी खाणाव ग्रामपंचायतचे उपसरपंच मंगेश पाटील, पोलीस पाटील सुधीर पाटील, सदस्य नथुराम ढेबे, सामाजिक कार्यकर्ते सुजित शिंदे, ग्रामपंचायत सदस्य खरवली राजू विचारे, माजी ग्रामपंचायत सदस्य एकनाथ घाटे, सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष महेश पाटील, ग्राम सर्वधन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर, प्रशांत पाटील, ग्रामस्थ संतोष घाटे, अंकुश माडे आदी उपस्थित होते.

- Advertisment -