Tuesday, November 29, 2022
Homeमहाराष्ट्ररायगडखराब झालेला रस्ता पुन्हा करून देणार ,रेल्वे ठेकेदारांचे आश्वासन !

खराब झालेला रस्ता पुन्हा करून देणार ,रेल्वे ठेकेदारांचे आश्वासन !

आरपीआय कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांच्या आंदोलनाला यश…

भिसेगाव- कर्जत(सुभाष सोनावणे) कर्जत नगर परिषदेच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या किरवली ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या किरवली गावातील डॉ . बाबासाहेब आंबेडकर नगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वेचे काम करणाऱ्या ठेकेदारांच्या पोकलंड , माल वाहतुकीच्या गाड्या , इतर सामुग्री गाड्यांतून जात असल्याने रहदारीचा रस्ता पूर्ण उखडून खराब झाला होता.
त्यामुळे या पावसाळ्यात परिसरातील नागरिकांना चालणे देखील मुश्किल झाले होते , रेल्वे ठेकेदारांच्या या मनमानी कारभाराविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांनी विरोध करत दंड थोपटले असता , रस्ता पुन्हा बनवून देण्याचे आश्वासन ठेकेदारांनी दिल्याने आरपीआय कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांचे आंदोलन यशस्वी झाले आहे.
किरवली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर कडे जाणाऱ्या रस्त्याच्या पुढे रेल्वेचे नवीन ट्रॅक पनवेल मार्गासाठी टाकण्याचे काम सुरू आहे.हे काम मे .ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड , मे. जे.एम.म्हात्रे इन्फ्रा प्रा. लिमिटेड , व शिंदे डेव्हलपर्स प्रा. लिमिटेड अश्या ठेकेदारांचे काम सुरू आहे . कामासाठी या रस्त्याने पोकलंड , माल वाहतूक गाड्या , व इतर काम करण्यासाठीची अवजारे गाड्यातून नेत असताना येथील रस्त्याची वाताहात झाली होती , हि बाब , आरपीआय कर्जत तालुका अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य हिरामण भाई गायकवाड यांना समजल्यावर त्यांनी कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन गाड्या अडवून या रस्त्यावरून जाण्यास मज्जाव केला.मात्र या तिन्ही ठेकेदारांनी रस्ता पुन्हा सुस्थितीत करण्याचे आश्वासन दिले.
त्यातच तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांनी येथील कार्यकत्यांना रोजगार देण्याची मागणी केली असता ,चालू असलेल्या कामांत स्थानिक तरुण व बेरोजगारांना रोजगार देण्याचे देखील ठेकेदारांनी मान्य केले आहे.आरपीआय कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांनी केलेल्या या आंदोलनाला यश आले असून परिसरातील नागरिकांनी त्यांचे कौतुक केले आहे.
त्यांच्या सोबत आरपीआय चे मंगेश गायकवाड , किरण गायकवाड , महेंद्र भालेराव , मयूर गायकवाड , विशाल गायकवाड , रुपेश भालेराव , गौरव गायकवाड , उमेश भालेराव , सुखदेव भालेराव , योगेश गायकवाड , सुजित गायकवाड , कल्पेश गायकवाड , निखील गायकवाड , सुरज गायकवाड , सिद्धेश गायकवाड , सागर गायकवाड , स्वप्नील गायकवाड , राजेश गायकवाड , अमर गायकवाड आदी कार्यकर्ते गाड्या रस्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page