Friday, December 8, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडखालापुरात साबाई मातेच्या मूलस्थानी डोंगराला मानाचा ध्वज लावण्याची परंपरा आजही कायम...

खालापुरात साबाई मातेच्या मूलस्थानी डोंगराला मानाचा ध्वज लावण्याची परंपरा आजही कायम…

खलापुर(दत्तात्रय शेडगे)खालापूरची ग्रामदेवता आई साबाई मातेच्या मूळस्थानी ढापनी गडावर हनुमान जयंती निमीत्ताने परंपरानुसार मानाचा ध्वज लावायची परंपरा देवीचे पुजारी राजेश देसाई व दिपक जगताप यांनी कायम ठेवली साबाई मातेचं खालापूर गावात भव्य मंदिर असून देवीचे मूलस्थान मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग लगत ढापनी गडावर आहे.

हनुमान जयंतीला मानाचा ध्वज लावण्याची परंपरा कायम वर्षोनुवर्षे कायम चालत आलेली आहे अवघड चढण चढत एक ते दीड तासाची पायवाट तुडवीत देवीच्या मूलस्थानावर वर्षातून एकदा भगवा ध्वज लावण्यात येतो.ह्या वर्षीही लोकडाऊन असल्यामुळे ही परंपरा खंडित होते की काय म्हणून खालापूर शहरातील देवीचे भाविक भक्त मनातून कुठेतरी नाराज होते.

परंतु मंदिराचे पुजारी राजेश देसाई व दिपक जगताप यांनी शासनाच्या नियमांचे पालन करीत मोठ्या संख्येने न जाता परंपरेनुसार ध्वज लावण्याचा निर्णय घेतला ह्यावेळी खालापूर शहरातील भाविक भक्त कौस्तुभ जोशी,उमेश पडवकर , नितीन पाटील,रुपेश चौधरी , मंगेश चाळके यांच्या सह पहाटे ढापणी गडाची वाट धरत अवघड चढण चढून देवीच्या मूलस्थानी पोहचले परंपरेनुसार देवीची पूजा अर्चा करून ग्रामदेवता आई साबाई मातेचा मानाचा ध्वज लावण्यात आला ह्यावेळी संपूर्ण जगावरील कोरणाचे संकट दूर होउदे अशी प्रार्थना आई साबाई मातेच्या चरणी करण्यात आली.

- Advertisment -

You cannot copy content of this page