खालापूरातील मुख्यमंत्र्यांच्या फार्महाऊसची चौकशी करणार्याच्या एटिएस ने मुसक्या आवळल्या..

0
489

खोपोली- दत्तात्रय शेडगे

खालापूर तालुक्यातील भिलवले गावच्या हद्दीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फार्महाऊस ची चौकशी करणाऱ्या तीन व्यक्तींना एटिस पथकाने अटक केली आहे,खालापुरातील भिलवले येथे असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फार्म हाऊस ची टुरिस्ट गाडीतून तिघेजण येऊन फार्महाऊस ची चौकशी करत आले होते,त्यांनी फार्महाऊसच्या सुरक्षारक्षक याच्याकडे इम्तियाज नावाच्या माणसाची चौकशी केली.
आपण अशा माणसाला ओळखत नाही व अशा नावाचा माणूसही येथे काम करीत नाही असे सुरक्षारक्षक याने सांगितले,पण आलेल्या तिघांनी धमकी दिली व निघून गेले,मात्र सुरक्षारक्षक यांनी या टुरिस्ट गाडीचा नंबर घेऊन तो पोलीस व मुख्यमंत्री यांना कळविला,लागलीच सर्व पोलीस यंत्रणा सावध झाली,नविमुंबई हद्दीत रायगड जिल्ह्यात एटीएस ने या तिघांना ताब्यात घेतले असून त्यांची सखोल चौकशी करण्यात येत आहे.
रायगड पोलीस अधीक्षक हे देखील खालापूर या ठिकाणी येऊन एटीएस बरोबर चौकशी करीत असल्याचे समजते.मुख्यमंत्री यांचे मुंबईत असलेला मातोश्री बंगला उडवून देण्याची धमकी व मुख्यमंत्री यांच्या बरोबर गृहमंत्री यांनाही जीवे मारण्याची धमकी काही दिवसांपूर्वी आली होती,त्याच पार्श्वभूमीवर सर्व पोलीस यंत्रणा सावध झाली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सुमारे २५ वर्षांपासून खालापूर तालुक्यातील भिलवले धरणाच्या कडेला फार्महाऊस आहे,कधीतरी वेळ काढून ते येथे विश्रांती घेण्यासाठीयायचे, स्व.मीनाताई ठाकरे यांची ही आवडती जागा होती.येथूनच त्या मुंबईत जात असताना वाटेत हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचे निधन झाले.फार्महाऊस वर मुंबई पोलीस यांच्यासह रायगड पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.