Sunday, September 24, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडखालापूर पोलिसांचा पोलीस अधिक्षकांच्या हस्ते झाला सन्मान.

खालापूर पोलिसांचा पोलीस अधिक्षकांच्या हस्ते झाला सन्मान.

खालापूर (दत्तात्रय शेडगे)
व्हीवो-खालापूरचे पोलिस निरीक्षक अनिल विभूते यांनी खालापूर पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारांवर चांगलाच अंकुश ठेवण्यात त्यांना आणि त्यांच्या टीमला यश आल आहे त्यांच्या चाणाक्ष नजरेतून गुन्हेगार काही काळातच गजाआड होणार असा विश्वास खालापूरातील जनतेला वाटू लागला आहे.

त्यातच ओक्तीबर महिन्यात तीन गंभीर गुन्ह्यांची उकल त्यांनि काही दिवसांच्या आत केले आहे त्यामध्ये खून प्रकरणातील गुन्हेगार बारा तासांच्या आत गजाआड केल्याने सर्वत्र कौतुक होत असताना.

रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक अनिल विभूते,सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे,संजय बांगर,पोसई बजरंग राजपूत,मपोसई सरला काळे,पोह नितीन शेडगे,हेमंत कोकाटे,सचिन व्हसकोटी या सर्वांना सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले पोलीस अधीक्षकांच्या हस्ते खालापूर पोलिसांचा उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सन्मान झाल्याने त्यांच्यावर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

- Advertisment -