खासदार श्रीरंग बारणे यांचा वाढदिवस पवना नगर येथे कीर्तनाने साजरा… नागरिकांचा उदंड प्रतिसाद !

0
73

पवना नगर : संसद रत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त पवना नगर येथे हभप निवृत्ती महाराज देशमुख ( इंदुरीकर ) यांच्या कीर्तनाचे आयोजन शिव सेना पवना नगरच्या वतीने करण्यात आले.

यावेळी खासदार श्रीरंग आप्पा बारणे,तालुका प्रमुख राजू खांडभोर , मदन शेडगे , वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश केदारी, युवा सेना तालुका अधिकारी अनिकेत घुले इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. खासदार बारणे यांचा पवन मावळ वारकरी संप्रदायाच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच जन्मदिनाच्या शुभेच्छा ही देण्यात आल्या.

यावेळी दत्ता भेगडे , राम सावंत , उमेश दहीभाते , प्रवीण कालेकर , सचिन कालेकर , किशोर शिर्के , अजित कुंभार , अतुल केंडे , संतोष कालेकर , विकास कालेकर , प्रवीण वैष्णव , तेजस गांधी , संतोष शिंदे तानाजी लायगुडे , अंकुश वाघमारे , विलास वरघडे , संजय दिवडकर , सन्नी जव्हेरी इत्यादी कार्यकर्त्यांसमवेत अनेक वारकरी महाराज, नागरिक बंधु व भगिनी मोठया संख्येने कार्यक्रमास उपस्थित होत्या.