Tuesday, June 6, 2023
Homeपुणेलोणावळाखासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेची पत्रकार परिषद लोणावळा येथे संपन्न...

खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेची पत्रकार परिषद लोणावळा येथे संपन्न…

लोणावळा : लोणावळा शहर शिवसेना पक्षाची पत्रकार परिषद हॉटेल सीटरस येथे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

लोणावळा नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसंदर्भात बोलताना खासदार बारणे म्हणाले लोणावळा नगरपरिषदेची आगामी निवडणूक शिवसेना पुर्ण ताकदीने लढणार असून ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढायची की शिवसेना म्हणून लढायची याबाबत अद्याप निश्चित धोरण नाही.तसेच शिवसेना विकासासाठी झटणारा सक्षम उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याचे बारणे यांनी सांगितले.

महाविकास आघाडीत बार्गेनिंग ताकद कोणाचीच नसून लोणावळा नगरपरिषदेवर सत्ता मिळवायची असले तर प्रत्येकाला तडजोडीला सामोरे जावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले .बारणे म्हणाले राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून लोणावळा शहर व परिसरातील कार्ला लेणी , लायन्स पॉईट , भुशी धरण या भागातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला आहे . लवकरच कार्ला लेणी गड परिसरातील विकामांचे भूमीपुजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे . लोणावळा शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील . उड्डाणपुलाची कामे लवकर मार्गी लावण्यासाठी तसेच रेल्वे विभागातील कामे करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु असल्याचे खासदारांनी सांगितले . लोणावळा शहरात असो वा मावळात प्रभागरचना करताना काही ठिकाणी चुका झाल्या आहेत हे नाकारता येणार नसले तरी केलेली विकासकामे या जोरावर निवडणूकांना सामोरे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले . महाविकास आघाडी व्हावी याकरिता आम्ही सकारात्मक असून याकरिता राष्ट्रवादीचे आमदार सुनिल शेळके , काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली असल्याचे बारणे यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना संपर्कनेते गणेश जाधव , शिवसेना पुणे उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे , महिला जिल्हा संघटक शादान चौधरी , मावळ तालुकाप्रमुख राजेश खांडभोर , लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक , उपतालुका प्रमुख आशिष ठोंबरे , मावळ युवासेना अधिकारी शाम सुतार , लोणावळा महिला अध्यक्षा कल्पना आखाडे यांच्यासह शिवसेना नगरसेवक , नगरसेविका व पदाधिकारी उपस्थित होते . संजय भोईर, विजय तिकोणे आदी मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page