खेड येथील मित्राचा खून करून फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात..

0
726

पुणे : खेड पोलीस स्टेशन हद्दीत जुन्या भांडणावरून मित्रांनीच मित्राचा खून केल्याची खालबळजनक घटना दि. 22 रोजी उघडकीस आली होती.या गुन्ह्यातील दोन आरोपींना स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने वलवण, लोणावळा येथून अटक केली आहे.

खेड पोलीस स्टेशन मध्ये दि.22/2/2022 रोजी गु.र.नं 111/2022 भादवि कलम 302,34 नुसार गुन्हा दाखल झाला होता. बाळासाहेब सखाराम चौधरी (वय 40 वर्ष,रा.खरपुडी ता. खेड जि. पुणे) यांनी खेड पोलिसांत फिर्याद दिली आहे.मी कामावरून घरी आलो असता माझा भाऊ स्वप्नील चौधरी हा घरी दिसला नाही.त्याचा आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता तो कुठेही दिसून आला नाही.तदनंतर दुसऱ्या दिवशी दि.22 रोजी सायंकाळी आमच्या गावचे पोलिस पाटील यांनी मला सांगितले की नवीन खेड घाट येथे तुज्या भावाचा खून झाला आहे.खात्री करण्यासाठी मी डेड हाऊस येथे जाऊन मयत बॉडी पाहिली तर ति माझा भाऊ स्वप्नील सखाराम चौधरी याची होती. अशी फिर्याद दिली होती.

सदर गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे आरोपीचा लवकरात लवकर शोध घेऊन गून्हा उघडकीस आणण्याच्या सुचना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी स्थानिक गून्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या.

त्यानुसार दि.23 रोजी स्थानीक गुन्हे शाखेचे पथक खेड भागात आरोपींचा शोध घेत असताना फिर्यादी तसेच गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मयत स्वप्नील सखाराम चौधरी याचे दोन मित्र निलेश ऊर्फ बाळ्या चांगदेव गायकवाड तसेच अमित ऊर्फ अमत्या हिरामण चौधरी दोघे (रा. खरपुडी ता. खेड जि. पुणे ) हे घटना घडल्यापासुन गावात दिसत नाहित तसेच सदर दोन्हीं इसम हे मयत स्वप्नील चौधरी याचे मित्र असुन घटना घडली त्या दिवशी सोबत होते अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर इसमांचा स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने खेड परिसरात शोध सुरू केला असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील संशयित दोन्हीं इसम हे वलवण , लोणावळा येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळण्याने गुन्हे शाखेच्या पथकाने वेषांतर करुन सदर ठिकाणी सापळा लाऊन दोन इसमांना ताब्यात घेतले. त्यांना त्यांचे नाव पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) निलेश चांगदेव गायकवाड( वय 25 वर्ष, रा. खरपुडी ता. खेड जि.पुणे) 2) अमित हिरामण चौधरी (वय 21 वर्ष, रा. खरपुडी ता. खेड जि. पुणे ) असे सांगीतले. त्यांच्याकडे सदर गुन्ह्या बाबत चौकशी केली असता जून्या भांडणाच्या वादातून सदरचा खून केला असल्याची कबुली त्यांनी दिली.

सदर दोन्ही आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास करनण्याकामी खेड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक, डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, सहाय्यक फोजदार प्रकाश वाघमारे ,पो.हवा.दिपक साबळे, पो.हवा.विक्रमतापकीर, पो.हवा.राजू मोमीन,पो. ना. संदिप वारे,पो. कॉ. अक्षय नवले,पो. कॉ प्रसन्न घाडगे,पो. कॉ प्राण येवले, चालक स. फौज. काशिनाथ राजापूरे यांच्या पथकाने अवघ्या दोन दिवसात खुनातील आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याची उत्कृष्ट कामगिरी केली आहे.