Sunday, March 16, 2025
Homeमहाराष्ट्ररायगड" खोपोलीत " ॲब्ज कोअर पॅशन फॉर फिटनेस " या युनिसेक्स जिमचे...

” खोपोलीत ” ॲब्ज कोअर पॅशन फॉर फिटनेस ” या युनिसेक्स जिमचे होणार ग्रँड ओपनिंग “…

आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या हस्ते १ फेब्रुवारी ला…

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे )आजकालच्या धावपळीच्या व स्पर्धेच्या युगात यशस्वी कामा बरोबरच आपल्या शरीराची ठेवण हि साजेशी असणे गरजेचे आहे . फिटनेस ही ” दिसण्या ” बरोबरच ” असण्या ” ची महत्वाची बाब असल्याने तरुणांसाठी खोपोली शहरातील नामवंत ज्येष्ठ समाजसेवक माजी उपनगराध्यक्ष इब्राहिम पाटील यांचे सुपुत्र ” एस.पी. डेव्हलपरचे संचालक शहानवाज पाटील ” यांच्या संकल्पनेतून १ फेब्रुवारी रोजी ” ॲब्ज कोअर पॅशन फॉर फिटनेस ” या युनिसेक्स जिमची ग्रँड ओपनिंग कर्जत- खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाला शुभेच्छा आशीर्वाद देण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ” संसद रत्न ” खासदार श्रीरंग आप्पा बारणे हे उपस्थित राहणार आहे .

जिम करताना फक्त प्रमाणबद्ध शरीरयष्टी म्हणजे फिटनेस नव्हे तर शारीरिक – मानसिक – आणि सामाजिक दृष्ट्या निरोगी आणि कार्यरत असणे गरजेचे असताना ॲब्ज कोअर या खोपोली ” अलायना सिटी प्लाझा ” येथे पॅशन फॉर फिटनेस या युनिसेक्स जिम मध्ये शारिरीक व्यायाम पध्दतीत संशोधन करून तज्ञांच्या परीक्षणानुसार जागतिक दर्जाच्या आधुनिक बनावटीचे एक्सरसाइज उपकरणे निवडण्यात आले आहे . प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक व्यायाम , वजन यांचे संतुलन करून योगा , झुंबा , कॅलिस्थेनिक्स क्रॉस फिट , स्वतंत्र सुरक्षित लेडीज बाथ , कार्यात्मक प्रशिक्षण , मसाज सेंटर , स्टीम रूम अशा एक न अनेक सोयी सुविधा जिम मध्ये उपलब्ध आहेत , अशी माहिती जिम हेड प्रशिक्षक अरुणा भारती यांनी दिली आहे . या सर्व महत्त्वपूर्ण वर्क आऊट ट्रेनिंग ठिकाणी प्रथम प्रवेशिकांना आकर्षक सूट विशेष सवलती देण्यात येणार आहे . सुरक्षित सुंदर , संगीतमय व वातानुकूलित प्रसन्न अश्या वातावरणात ॲब्ज कोअर चे व्यवस्थापन ” पॅशन फॉर फिटनेस ” या तत्त्वावर कार्यरत आहे .

खोपोलीकरांच्या सेवेत सदैव अभिनव उपक्रम राबविताना शहानवाज इब्राहिम पाटील मित्र परिवाराने या शुभप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे , अशी विनंती केली आहे. प्रवेशा संबंधित अधिक माहितीसाठी 9554599554 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा , असे शहानवाज पाटील यांनी सांगितले आहे .
- Advertisment -

You cannot copy content of this page