Saturday, October 1, 2022
Homeमहाराष्ट्ररायगडखोपोली एक्सप्रेसवे वर तीन वाहनांचा भीषण अपघात एकाचा मृत्यू...

खोपोली एक्सप्रेसवे वर तीन वाहनांचा भीषण अपघात एकाचा मृत्यू…

खोपोली (प्रतिनिधी ): पुणे – मुंबई एक्सप्रेसवर खोपोली येथे आज सकाळी 9.30 च्या सुमारास भीषण अपघात झाला .या अपघातात खोपोली येथे एका ट्रकने पुढील कार , एस टी महामंडळाची शिवनेरी बस व कंटेनरला धडक दिल्याने एकाचा मृत्यू तर दोन किरकोळ जखमी झाले आहेत.

खोपोली पोलीसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार , हा अपघात आज सकाळी घाट संपल्यावर खोपोली एग्जीटच्या थोडे पुढे झाला.मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने तो पुढे असलेल्या कार व एस टी महामंडळाच्या शिवनेरी बसला धडकला.

त्यानंतर तो ट्रक एका कंटेनर ट्रकला जाऊन जोरदार धडकला . त्याचा पुढचा भाग पूर्ण चकाचूर झाला असून ट्रक ड्राइवर त्यात अडकून मरण पावला.

कारमधील एकास तसेच बसमधील एकास किरकोळ दुखापत झाली आहे. मयत ड्राइवर व दोन्ही जखमी व्यक्तींना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात नेण्यात आले असून तेथेच जखमींवर उपचार करण्यात येत आहेत.

- Advertisment -

You cannot copy content of this page