खोपोली जवळ मक्याचा ट्रक उलटल्याने काही वेळ वाहतूक ठप्प..

0
49

लोणावळा : मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर मक्याचा ट्रक पलटी झाल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत.

मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर खोपोली जवळ मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या माल वाहू ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने मक्याने भरलेला ट्रक रस्त्याच्या मधेच पलटी झाल्याने पूर्ण रस्त्यावर मक्याची पोती व मका पसरल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.

परंतु अपघाताची माहिती कळताच आय आर बी व अपघात बचाव पथक घटना स्थळी दाखल होऊन सदरचा ट्रक तातडीने बाजूला करण्यात यशस्वी झाले. या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नसून ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.