Wednesday, June 7, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडखोपोली पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षकपदी कु. श्रुती शेवते...

खोपोली पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षकपदी कु. श्रुती शेवते…

खोपोली : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत कु . श्रुती सागर शेवते यांना खोपोली पोलीस ठाण्याचा प्रतिकात्मक स्वरूपात प्रभारी निरीक्षक होण्याचा मान मिळाला.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी कु.श्रुती सागर शेवते यांच्या हाती प्रभारी पोलीस निरीक्षक पदाची सूत्रे प्रतिकात्मक स्वरूपात सोपवून महिलांचा सन्मान केला . त्याच सोबत पोलीस स्टेशन परिसरात स्वच्छतेची कामगिरी बजावणाऱ्या श्रीमती अनिता संतोष करकरे यांचा सन्मान करताना त्यांना सोबतच्या आसनावर स्थानापन्न केले .

खोपोली सारख्या अतिमहत्त्वाच्या पोलीस स्टेशनची जबाबदारी आपल्या खांद्यावर येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते , अशी प्रतिक्रिया चार्टर्ड अकाउंटंटचा अभ्यास करणारी विद्यार्थिनी कुमारी श्रुती सागर शेवते यांनीआपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी खोपोली पोलीस ठाण्याच्या सर्व महिला कर्मचारी वर्गाला पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिरीष पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.उत्कृष्ट कामगिरी केलेल्या महिला कर्मचारी वर्गाचे कौतुक करताना त्यांना रोख रक्कमेचे बक्षीसही दिले.आपल्या सोबत रात्रंदिवस ड्युटी बजावताना महिला कर्मचारी कार्यक्षमतेत कुठेच कमी पडत नाही ही स्वतःसाठी गर्वाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच प्रभारी पोलीस निरीक्षक कु.श्रुती सागर शेवते यांच्या हातून निरंतर देशसेवा घडावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली . महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित छोटेखानी कार्यक्रमात खोपोली पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश ळशेकर आणि कर्मचाऱ्यां समवेत पत्रकार बांधव उपस्थित होते.

You cannot copy content of this page