खोपोली प्रशासना विरुद्ध केलेले पत्रकार किशोर साळुंके यांचे उपोषण आज मागे ! - ASHTADISHA Covers Marathi News Nation wide
Home महाराष्ट्र रायगड खोपोली प्रशासना विरुद्ध केलेले पत्रकार किशोर साळुंके यांचे उपोषण आज मागे !

खोपोली प्रशासना विरुद्ध केलेले पत्रकार किशोर साळुंके यांचे उपोषण आज मागे !

0

खोपोली : शहरातील अनाधिकृत बांधकामांविरोधात पत्रकार किशोर साळुंके यांनी खोपोली नगरपरिषद इमारती बाहेर अमरण उपोषण केले होते.

त्या उपोषणास आज अखेर मुख्याधिकारी यांच्या लेखी अश्वासनाने पूर्ण विराम लागला आहे.

खोपोली नगरपरिषद हद्दीतील अनेक प्रभागात विविध बिल्डर व अन्य जणांनी केलेल्या अनाधिकृत बांधकाम यामधे इमारती, दुकाने, मॉल, बार, मेडिकल, एटीएम, बँक इत्यादि शासकीय जागेवर कब्जा केल्या बाबत अनेकदा बहुजन युथ पँथरचे शहर अध्यक्ष पत्रकार किशोर साळुंके यांनी खोपोली नगरपरिषदेला पत्र दिले होते.

परंतु नगरपालिके मार्फत कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नव्हती या कारणाने अखेर मंगळावर दि. 8 मार्च रोजी खोपोली नगरपरिषदेच्या प्रशासना विरोधात , नगरपरिषदे समोर आमरण उपोषणाला पत्रकार किशोर साळुंके यांनी सुरुवात केली,उपोषणाला बसताच आजी , माजी नगरसेवक , विविध संघटना व बहुजन युथ पँथर या संघटनेचा पाठींबा मिळाला असल्याने , नगरपालिका अधिकारी जो पर्यंत अनाधिकृत बांधकामांविरोधात कारवाई बाबत निर्णय घेत नाही तो पर्यन्त उपोषण सुरू ठेवणार यावर किशोर साळुंके ठाम होते.

परंतु बहुजन युथ पँथरचे संस्थापक अध्यक्ष भाईसाहेब जाधव हे आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन नगरपालिका कार्यालयात आक्रमक भूमिकेत मुख्याधिकारी अनुप धुरे यांना भेटून चर्चा केली असता मुख्याधिकारी यांनी चर्चेचा मान ठेऊन काही कालावधीनंतर लगेच उपोषणकर्ते पत्रकार किशोर साळुंके यांची भेट घेत त्यांच्या ज्या विविध मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याचे लेखी स्वरुपात पत्र दिले व पाणी पाजून उपोषण सोडवले,

यावेळी माजी जेष्ठ नगरसेवक मोहन औसरमल , शहर प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष सुनील पाटील , माजी नगरसेवक किशोर पानसरे , अमोल जाधव, सामाजिक कार्यकर्ते दिलीप पुरी , हरीष काळे , सचिन मोरे , अरुण पूरी तसेच आजी माजी नगरसेवक , विविध संघटना , पत्रकार मित्र तसेच बहुजन युथ पँथरचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

You cannot copy content of this page

Exit mobile version