Sunday, December 8, 2024
Homeपुणेकामशेतगणेश काजळे यांच्या आपले सरकार नागरी ई सुविधा केंद्राचे पुणे कसबा आमदार...

गणेश काजळे यांच्या आपले सरकार नागरी ई सुविधा केंद्राचे पुणे कसबा आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते उदघाटन..

कामशेत (प्रतिनिधी) : कामशेत येथे आपले सरकार नागरी ई सुविधा केंद्र संजय गांधी निराधार या केंद्राचे उद्घाटन पुणे कसबा येथील आमदार रविंद्र धंगेकर यांचे हस्ते करण्यात आले.
सदस्य गणेश काजळे यांनी सुरु केलेले हे नागरी ई सुविधा केंद्र असून यावेळी भारतीय काँग्रेसचे सचिव पृथ्वीराज साठे, माजी राज्यमंत्री मदनशेठ बाफना, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पै चंद्रकांत सातकर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माऊली दाभाडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, पुणे महानगर पालिकेचे माजी नगरसेवक कैलास दांगट, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस निखिल कविश्वर, लोणावळा शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, दीपक हुलावळे, यादेवेंद्र खळदे, महेश बापू ढमढरे, पृथ्वीराज पाटील, किरण गायकवाड, मुळशी तालुका अध्यक्ष गंगाराम मातिरे, राजेश वाघुले, यशवंत मोहोळ, प्रमोद गायकवाड, दिपक हुलावळे, भरत येवले, सुभाष जाधव, नामदेव शेलार, नंदुशेठ वाळुंज, प्रकाश आगळमे, विजय सातकर, विलास मालपोटे, राजाराम शिंदे, मावळ तालुका दिंडी समाज अध्यक्ष तुकाराम गायकवाड, ह भ प महादू सातकर, माऊली जांभूळकर उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप, मावळचे जनसेवक आमदार सुनिल आण्णा शेळके यांनी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी मावळ तालुका दिंडी समाज दिंडी ला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विणेकर हभप भाऊसाहेब महाराज टाकळकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
- Advertisment -

You cannot copy content of this page