if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांची प्रमुख उपस्थिती..
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) ” गुरू शिवाय विद्या नाही ” बाल पणापासून कोवळ्या मनावर ” आकार – आधार – संस्कार ” रुजवून महत्त्वपूर्ण काम करून देशाची भावी पिढी घडविण्याचे कार्य ” गुरुवर्य अर्थात शिक्षक ” करत असतात . अश्या या गुरुंप्रती त्यांनी केलेल्या या देशव्यापी कार्यास ” नतमस्तक ” होवून त्यांना सन्मानित करण्याच्या उद्दात्त हेतूने ” महेंद्र शेठ थोरवे फाऊंडेशनचे ” संस्थापक अध्यक्ष तथा कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षक दिना निमित्त ” शिक्षक सन्मान सोहळा ” गुरुवार दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजता शिवतीर्थ – पोसरी , ता. कर्जत, जि.रायगड येथे मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
भारताचे मा. राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीदिनी संपूर्ण देशात ” शिक्षक दिन सोहळा ” साजरा होत असतो . शिक्षक दिनाचे औचित्य साधून महेंद्र शेठ थोरवे फाउंडेशनच्या वतीने कर्जत व खालापूर तालुक्यातील ” गुणीजन व कर्तृत्ववान ” केंद्रप्रमुख , मुख्याध्यापक तसेच शिक्षक यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल त्यांचा सन्मान सोहळा संपन्न होत आहे.
” मातीच्या गोळ्याला आकार देणाऱ्या ” सर्जनशील ” हातांप्रमाणे शिक्षक मुलांना ” आकार ” देत असतात. राष्ट्रउभारणीचे काम करणाऱ्या शिक्षकांना सलाम करण्यासाठी यावेळी प्रमुख उपस्थिती मा. श्री .श्रीरंग आप्पा बारणे – खासदार , मावळ मतदार संघ , मा.श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे – आमदार , कोकण शिक्षक मतदार संघ , मा. श्री. चंद्रकांत साबळे ( गटविकास अधिकारी – पंचायत समिती कर्जत ) , मा. श्री. संतोष दौंड ( गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती कर्जत ) , मा. श्री . संदीप कराड ( गटविकास अधिकारी, पंचायत समिती खालापूर ) , मा .श्री .कैलास चोरामळे ( गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती खालापूर ) यांची असणार आहे , तरी सदर ” शिक्षक सन्मान सोहळ्यास ” आपण उपस्थित राहून आपला सन्मान स्वीकारावा, व इतर सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे , अशी विनंती व निमंत्रण आमदार महेंद्र शेठ थोरवे फाऊंडेशन – अध्यक्ष, तथा कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी केले आहे.