Friday, June 9, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडगोलमाल है भाई सब गोलमाल है , समस्या कर्जतच्या , रेल्वे प्रवासी...

गोलमाल है भाई सब गोलमाल है , समस्या कर्जतच्या , रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रहातात मुंबईला !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत रेल्वे प्रवासी वर्ग व नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी व रेल्वे प्रशासनाच्या विरोधात आपले न्याय हक्क मागण्यासाठी कर्जतकरांनी नेमलेल्या कर्जत रेल्वे पॅसेंजर असो. चे अध्यक्ष कर्जत तालुक्यात , ना कर्जत शहरात रहात नसून तर चक्क ते मुंबईत वास्तव्यास असून साधे येथील मतदान यादीत नाव नसलेले , आधारकार्ड देखील मुंबईचे असणारा अध्यक्ष का असावा ? असा संतप्त सवाल कर्जत रेल्वे पॅसेंजर असो.चे माजी अध्यक्ष प्रभाकर दादा करंजकर यांनी केला असून म्हणूनच तर कर्जतकर वासियांच्या अनेक वर्षे खितपत पडलेले रेल्वे प्रश्न ” जैसे थे ” आहेत , हि ” गोलमाल ” परिस्थिती बदलवून कर्जत तालुक्यातील वास्तव्यास असणारा रेल्वे प्रवासी संघटनेचा अध्यक्ष नेमावा , अशी प्रमुख मागणी रेल्वे प्रवासी संघटनेचे माजी अध्यक्ष प्रभाकर दादा करंजकर यांनी केली आहे.
कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष पद भूषविताना ज्या अध्यक्षांचा कर्जत नगरीत वास्तव्य नाही , त्यांनी केलेली दिशाभूल आता बंद करून आपल्या पदाचा व तीन वर्षांची कमिटी नेमलेली असताना आठ वर्षांचा कालावधी झाला असल्याने राजीनामे देवून पायउतार व्हावे , अशी संतापजनक मत व्यक्त केले आहे.

सन २०१५ रोजी नव्याने झालेल्या कर्जत रेल्वे पॅसेंजर असो. चे अध्यक्ष केतन शहा यांना करण्यात आले होते. मात्र ते करत असताना ते कुठे रहातात याचा विचार केला गेला नाही. त्यांचे वास्तव्य कर्जत येथे नसून ते मुंबई येथे रहात असल्याने आजपर्यंत उद्भवलेल्या रेल्वे समस्याकडे लक्ष न दिल्याने व कर्जतकर नागरिकांच्या कधीच संपर्कात नसलेले अध्यक्षांमुळे ना कधी विचार विनिमय , ना कधी मासिक बैठक तर आठ वर्षांत एकही सार्वजनिक बैठक घेतली नसल्याने यामुळे समस्यांचा डोंगर वाढत गेल्याचे माजी अध्यक्ष प्रभाकर करंजकर यांनी व्यथा मांडली आहे.
प्रवासी संघटनेच्या नियमानुसार मासिक सभा व वार्षिक सार्वजनिक बैठक सर्वांना आमंत्रित करून आयोजित करणे गरजेचे आहे , मात्र ज्यांचा कर्जतमध्ये वास्तव्य नाही , ते येथील समस्यांसाठी वेळ देत नसतील , त्यांनी पदभार सोडून दुसरा सर्वांच्या पसंतीचा अध्यक्ष नेमणे हेच उचित ठरेल , जेणेकरून येथील अध्यक्ष व नवीन कमिटी रेल्वे समस्यांसाठी रेल्वे प्रशासनाला सडेतोड जाब विचारू शकेल , त्याचप्रमाणे कमिटीचा कार्यकाळ हा तीन वर्षांचा असताना आज आठ वर्षे तीच कमिटी असणे , म्हणजे हुकुमशाही असल्याचा आरोप देखील करंजकर यांनी केला आहे.

या हुकुमशाही व गोलमाल , दिशाभूल करणारी परिस्थिती आणणारे कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष असलेले केतन शहा यांनी त्वरित राजीनामा देवून सर्व कमिटी बरखास्त करावी व कर्जत मधील राजकीय – सामाजिक – संघटनेत काम करणाऱ्या होतकरू कार्यकर्त्यांनी नवीन कार्यतत्पर अध्यक्ष व त्यांना सहकार्य करणारे कमिटी करण्याचे आवाहन कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे माजी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर दादा करंजकर यांनी तमाम कर्जतकर नागरिक , रेल्वे प्रवासी , यांना आवाहन केले आहे. जेणेकरून रेल्वे समस्या अधिक जटिल न होता सोडविता येतील , असे प्रांजळ मत त्यांनी मांडले असून येत्या १५ दिवसांत नवीन कमिटीसाठी आपण सर्व कर्जतकरांची बैठक आयोजित करणार असल्याचे सांगितले आहे.

You cannot copy content of this page