Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडग्रामपंचायत अंभेरपाडा येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश !

ग्रामपंचायत अंभेरपाडा येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत खालापूर मतदार संघात ” आमदार महेंद्र शेठ थोरवे ” यांच्या विकास कार्याचा ‘ डंका ” सर्वदूर पसरत असून त्यामुळे रोजच इतर पक्षाचे कार्यकर्ते शिवसेनेत पक्ष प्रवेश करून शिवबंधन हातात बांधत आहेत , हि किमया कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांची असून दिवसेंदिवस त्यांचे हात मजबूत होत आहेत . आज त्यांच्या कार्याने प्रभावित होवून कर्जत तालुक्यातील अंभेरपाडा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला.

यावेळी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रथमेश सुपे , यशवंत लांगी , योगेश लांगी , उत्तम लांगी , रवी लांगी ,हरीश तीटकरे , अजित लांगी , बळीराम कोंढवले , नरेश कोंढवले , गुरुनाथ लांगी , केतन अंभेरे , राजू कारोटे , प्रकाश धढवड ,आर्यन आसवले , जगू आसवले , सोमनाथ लाडके , कुमार कोकाटे , प्रेम आसवले , अभिजित लांगी , आदी कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला.

यावेळी याप्रसंगी उपसरपंच दत्ता सुपे, ग्रामपंचायत प्रमुख मारुती आंभेरे , तंटामुक्ती अध्यक्ष श्रावण मेमाणे आदी उपस्थित होते , तर देशमुख , ऍड . सुर्वे त्याचप्रमाणे शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page