![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(!empty($image5)); {?>
![]()
} ?>
कर्जत तालुक्यात पुरवठा शाखेने लक्ष देण्याची मागणी…
भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे )कर्जत तालुका हा आदिवासी बहुल भाग आहे , त्यातच गरीब , गरजू , कामगार , कष्टकरी वर्ग मोठ्या प्रमाणात येथे वास्तव्यास असल्याने अनेकांची कुटुंबे शासनाच्या रास्त भाव धान्यांवर गुजराण करत असताना शासनाच्या ऑन लाईन ई – पोस मशिनद्वारे ” थंब ” लावूनच धान्य मिळण्याची प्रक्रिया आता किचकट होऊ लागली आहे.चार वर्षांपूर्वी आलेली हि ई – पोस ची प्रक्रियेतील मशीन आता जुन्या , न चालणाऱ्या निकृष्ट मशीन झाल्याने अनेक समस्यांना ग्राहकांना व रास्त भाव धान्य चालक – मालक यांना तोंड द्यावे लागत आहे.
त्यामुळे एकतर नवीन मशीन द्या , नाहीतर आम्हाला ऑफ लाईन धान्य वाटप करण्याची परवानगी द्या , अशी मागणी घेऊन आज दि.२५ नोव्हेंबर २०२२ रोजी रास्त भाव धान्य दुकान कर्जत तालुका चालक – मालक संघटनेने कर्जत तहसीलदार कार्यालयातील पुरवठा शाखेकडे संघटनेचे सचिव सतीश गोपाळ हडप यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देऊन मागणी केली आहे.चार वर्षांपूर्वी आलेल्या ई – पोस मशीन आता २ वर्षांपासून धान्य वितरण करताना खराब झाल्याने वारंवार अडचणीं येत आहेत . याबाबत रास्त भाव धान्य दुकान कर्जत तालुका चालक-मालक संघटना यांनी वारंवार कर्जत तहसीलदार यांना कार्यालयात निवेदन देऊन आपल्या व्यथा मांडल्या आहेत.पूर्वी व्यवस्थित चालणाऱ्या या मशीन आता बिनकामी झाल्या आहेत.
या निकृष्ट झालेल्या मशीनवर राशन दुकानदार यांनी शासनाला मदत करून ग्राहकांचा रोष ओढवत आपल्या परीने धान्य वितरण करीत आहेत . गेल्या काही महिन्यांपासून ऑन लाईन सर्व्हर ची समस्या खूप प्रमाणात भेडसावत आहे , सर्व्हर समस्या विषयी देखील कर्जत तहसील कार्यालयात वारंवार पत्रव्यवहार सुद्धा केले आहेत , तरीही कोणत्याही प्रकारची सर्व्हर संबंधी समस्या दूर झाल्याचे दिसून येत नाही . गेल्या महिन्यापासून ई – पोस मशीनवर नवीन सॉफ्टवेअर वर्जन अपडेट झाला असून प्रत्येक कार्डधारकांसाठी दोन वेळा हाताचा ठसा ( थंब ) घ्यावे लागत आहे , त्यात सर्व्हर डाऊनच्या समस्यामुळे दुकानदार आणि ग्राहक यात वाद निर्माण होत आहेत . सर्व्हर डाऊनमुळे एकदा येऊन गेलेले कार्डधारक यांना धान्य नेण्यासाठी परत परत कधी बोलवावे , हा प्रश्न सुद्धा या समस्येवर न सुटणारे ” ग्रहणच ” ठरत आहे.
कारण सर्व्हर कधी सुरळीत होईल , याची शाश्वती नसते. कर्जत तालुक्यातील सर्व दुकानां समोर राशन घेण्यास आपला रोजगार सोडून , महत्वाची कामे सोडून ग्राहकांची लांबच लांब रांगा दिसून येत आहेत याबाबतीत देखील सदरचे छायाचित्र मोबाईल द्वारे कर्जत तहसील कार्यालयात पाठवले आहेत.सततच्या सर्व्हर डाऊनमुळे दुकानदार आणि ग्राहक यांच्यात होणाऱ्या वादामुळे त्रस्त झाले आहेत . वारंवार मशीन बाबत समस्या असल्यामुळे ग्राहक आणि दुकानदार यामध्ये असलेले चांगले संबंध वाद विवादामध्ये रूपांतर होत आहेत , दुकानदारांविषयी कार्डधारकांच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे.
भविष्यात हे वाद भांडणात रूपांतर कधी होतील , हे सांगता येत नसल्याने ई – पोस मशीनच्या , तसेच सर्व्हर डाऊनच्या समस्या व तांत्रिक अडचणी एनआयसी कडून सोडवले जात नाही तोपर्यंत कर्जत तहसीलदार यांनी स्वतः लक्ष घालून रास्त भाव धान्य दुकानदारांना ” ऑफलाईन ” धान्य वितरण वाटप करण्यास परवानगी देऊन विषय मार्गी लावावा , या प्रमुख मागण्या घेऊन संघटनेचे सचिव सतीश गोपाळ हडप यांच्या नेतृत्वाखाली हर्षदा संदीप हजारे – कोल्हारे , नामदेव गायकवाड – मांडवणे , गुलचंद भोईर – उकरूळ व राजेंद्र लाड – एकसल या संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सभासदांनी कर्जत तहसील कार्यालयात पुरवठा अव्वल कारकून नीता गोरेगावकर मॅडम यांना निवेदन देण्यात आले आहे.सतीश हडप , ( सचिव ) – शासनाने लवकरात लवकर खराब झालेल्या ई – पोस मशीन बदलून , ऑनलाईन सर्व्हर डाऊनच्या समस्यांत देखील मार्ग काढून ग्राहक व आमच्यात होणाऱ्या वादाकडे गांभीर्याने बघून आम्हा सर्व राशन दुकानदारांना कर्जत तहसीलदार यांनी न्याय द्यावा , अशी संतप्त मागणी संघटनेच्या माध्यमातून केली आहे.