Wednesday, October 16, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडघरगुती देखावा व गणेश मूर्ती स्पर्धा "…

घरगुती देखावा व गणेश मूर्ती स्पर्धा “…

शिवसेना व आमदार महेद्र शेठ थोरवे फाऊंडेशन आयोजित स्पर्धेत ” जिंका हजारोंची बक्षिसे !


भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) नुकतेच ” बाप्पाचे ” मोठ्या उत्साहात गणेश भक्तांच्या घरात आगमन झाले आहे . ” गणेशोत्सव ” सण म्हणजे सर्वत्र आनंदाचे वातावरण , या आनंदाला अजून द्विगुणित करण्यासाठी ” शिवसेना व महेंद्र शेठ थोरवे फाउंडेशनच्या ” माध्यमातून कर्जत खालापूर मतदार संघातील नागरिकांना ” घरगुती देखावा व गणेश मूर्ती स्पर्धा ” आयोजित करून हजारोंची बक्षिसे व आकर्षक भेट वस्तू जिंकण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे . तरी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन ” महेंद्र शेठ थोरवे फाऊंडेशन ” यांनी केले आहे.

या देखावा स्पर्धेत प्रथम पारितोषिक सोन्याचा मुकुट , द्वितीय पारितोषिक चांदीचा मुकुट , तृतीय पारितोषिक चांदीचा गणपती , तर ” श्री बाप्पाची ” मूर्ती स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गणेश भक्तांना पहिले बक्षीस ₹. २५०००/- , दुसरे बक्षीस ₹. १५०००/- , तिसरे पारितोषिक रू. १००००/- , व उत्कृष्ट मूर्तीकार चांदीचा गणपती , उत्तेजनार्थ आकर्षक बक्षीस व प्रत्येक सहभागी स्पर्धकास प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

तरी ०७ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत देखावा व मूर्तीचे तीन फोटो व व्हिडीओ पाठवावे , व्हिडिओ सोबत तुमचे नाव, मोबाईल नंबर व पत्ता पाठवावे , घरातील एका व्यक्तीचे Facebook / Instagram आयडी या क्रमांकावर 9145034040 पाठवावे , असे आवाहन शिवसेना व कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ सदाशिव थोरवे यांनी केले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page