घरगुती सिलेंडर मधून गॅस चोरी करणाऱ्या दुकानदाराला देहूरोड पोलिसांनी केली अटक…

0
51

देहूरोड : घरगुती गॅस सिलेंडर मधून लहान सिलेंडरमध्ये बेकायदेशीर आणि धोकादायकपणे गॅस चोरी करताना पोलिसांनी मंगळवार दि.26 रोजी एका दुकानदाराला अटक केली .

सागर उर्फ अनिल रामचंद्र खरात ( वय 21 , रा . विकासनगर , देहूरोड ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे . अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे पोलीस हवालदार सुनिल शिरसाठ यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , मंगळवारी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास आदर्शनगर बस स्टॉप जवळ देहूरोड येथे आरोपी घरगुती वापराच्या सिलेंडरमधील गॅस काढून तो लहान सिलेंडरमध्ये भरत असताना मिळून आला . तसेच त्याने कुठल्याही प्रकारची शासनाची परवानगी घेतली नसल्याचे तपासात समोर आले . आरोपीच्या ताब्यातून गॅस सिलेंडर , रोख रक्कम आणि रिफिलिंगचे साहित्य असा एकूण 14 हजार 925 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून पुढील तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.