लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील रहिवाशांनी आपल्याकडे राहत असलेल्या भाडेकरू ची लोणावळा ग्रामीण पोलिसांना माहिती दिली नसेल तर ती सात दिवसांत देण्यात यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
जर एखाद्या घरमालकाकडे कोणी भाडेकरू राहत असेल , तर अशा भाडेतत्वावर राहणाऱ्या व्यक्तींची माहिती विहित नमुन्यात भरून ती स्थानिक पोलीस स्टेशनला सादर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे . ही माहिती सात दिवसांत देणे घरमालकांना बंधनकारक असल्याचे पोलिसांनी सांगितले असून त्याबाबत जिल्हाधिकारी , पुणे यांनी आदेश पारित केला आहे.
सदर सुचनेनंतर सात दिवसांच्या आत सर्व घरमालकांनी त्यांच्याकडे भाडे तत्वाने राहत असलेल्या भाडेकरू यांची माहिती लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे न चुकता सादर करावी . तसेच , जे घरमालक भाडेकरूंची माहिती सादर करणार नाहीत , अशा घरमालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे , अशी माहिती लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिली आहे.