चिखली येथील आठ वर्षाच्या मुलाच्या खुनातील आरोपीस 48 तासातच केले गजाआड…

0
108

चिखली : रविवारी दि .17 रोजी चिखली येथील आठ वर्षीय मुलाचा दगडाने ठेचून खून झाल्याची धक्कादायक घटना घडली होती.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती तसेच या आठ वर्षीय मुलाचा खून कोणत्या करणातून झाला याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले असताना गुंडा विरोधी पथकाने तब्बल 48 तासांत याप्रकरणाचा छडा लावत लावला व मंगळवार दि.19 रोजी एका आरोपीला अटक केली . खंडणीसाठी मुलाचे अपहरण केले व त्यानंतर डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याची माहिती उघडकीस आली आहे.

बपील अहमद रईस लष्कर ( वय 26 , रा . हरगुडेवस्ती , कुदळवाडी , चिखली मुळगाव आसाम ) असे अटक आरोपीचे नाव आहे. तर लक्ष्मण बाबुराम देवासी ( वय 8 , रा . हरगुडे वस्ती , चिखली मुळगाव राजस्थान ) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे .

चिखली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , गुंडा विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषण करत घटनास्थळावरील 83 सीसीटिव्ही तपासत संशयीत आरोपीला ताब्यात घेतले . त्याची कसून चौकशी केली असता आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली.खून झालेल्या मुलाच्या आई वडिलांकडून एक लाख रुपये खंडणी मागण्याच्या उद्देशाने त्याचे अपहरण करुन त्याला पत्र्याच्या शेडमध्ये नेल्यास तो मुलगा आरडाओरडा करु लागल्याने त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खुन केला असल्याची कबुली आरोपीने दिली आहे.