लोणावळा (प्रतिनिधी): शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या सुशोभिकरणाचे काम अद्यापही सुरु झाले नसून ते त्वरीत चालू करण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लो.न.प. मुख्याधिकारी पंडित पाटील यांना शुक्रवार दि.3 रोजी निवेदन देण्यात आले.तसेच या कामाची आठवण रहावी यासाठी शिवप्रतिमा भेट देण्यात आली.
गेल्या काही वर्षापासून महाराजांच्या स्मारकाचा विषय हा रेंगाळत चालला आहे. प्रत्येक वेळेस लोणावळा नगरपरिषद प्रशासन उत्तरे देत ह्या विषयात नागरिकांची समजूत काढून चाल ढकल करीत आहेत.या सुशोभीकरणाचा प्रशासनास विसर पडला असून हे काम त्यांच्या कायम स्मरणात राहावे यासाठी मनसे च्या वतीने नगरपरिषदेस शिवप्रतिमा भेट देण्यात आली.
काही महिन्यांपूर्वीच झालेल्या मिटींग मध्ये प्रशासनाने सांगितले होते की जानेवारी पर्यंत काम चालू होईल, पण प्रत्यक्षदर्शी बघता आता जानेवारी महिना सुद्धा संपला आहे तरी अद्यापही हे काम सुरु झालेले नाही.त्यामुळे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपली कोणतीही कारणे ऐकून न घेता येत्या 15 फेब्रुवारी पर्यंत काम चालू करा अशी विनंती करण्यात आली आहे. तसेच 15 फेब्रुवारी पर्यंत स्मारकाचे काम चालू झाले नाही तर मनसेच्या वतीने लोणावळा शहरात तिव्र आंदोलन केल्यास त्यासाठी सर्वस्वी जबाबदार लो.न.प.प्रशासन असेल असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी मनसे शहराध्यक्ष भारत चिकणे,अमित भोसले, निखिल भोसले, दिनेश कालेकर,अभिजित फासगे, शिरीष गावडे, अमर जंगम, विपुल माने आदी कार्यकर्ते उपस्थित होते.