छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांगरगाव येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन…

0
58

लोणावळा : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जयहिंद मित्र मंडळ, शिवजन्मोत्सव मंडळ नांगरगाव यांच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवून उत्साहाने जयंती साजरी करण्यात आली.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनयजी दाभाडे यांचे छत्रपती शिवशंभू चरित्र व्याख्यान ठेवण्यात आले .महिलांसाठी संगीत खुर्ची ,लोकनृत्य स्पर्धा इत्यादी विविध कार्यक्रम घेण्यात आले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.

या कार्यक्रमास माजी जिल्हा शिवसेनाप्रमुख मच्छिंद्र खराडे,शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, लोनप माजी शिक्षणसमिती सभापती ब्रीन्दा गणात्रा,माजी शहरप्रमुख बबनराव अनसुरकर, उपशहरप्रमुख संजय भोईर,‌ विभाग प्रमुख उल्हास भांगरे,‌माजी शिक्षण मंडळ सभापती प्रदीप थत्ते, शंकरभाऊ जाधव, मारुती जाधव,बाळासाहेब जाधव, शाखा प्रमुख गणेश जाधव, उमेश शिरंबेकर,अनिल भांगरे, धीरज घारे , विवेक भांगरे ,प्रशांत जाधव,नितीन दुर्गे विठ्ठल रुक्मिणी ट्रस्टचे पदाधिकारी व नांगरगाव विभागातील महिला भगिनी , लहान मुले सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळकृष्ण बलकवडे सर यांनी केले.