जल जीवन मिशन अंतर्गत पाचाणे येथील नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन संपन्न…

0
19

मावळ : जल जीवन मिशन अंतर्गत पाचाणे गावातील 1 कोटी 51 लक्ष रु.च्या नळ पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ महिला-भगिनींच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

‘पाचाणे गावातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, वीजेचे पोल, तलाठी कार्यालय इ.विकासकामांसाठी सुमारे 3 कोटी 36 लक्ष रु.निधी उपलब्ध करण्यात आला आहे. “गावच्या विकासासाठी सर्वजण एकत्र येऊन काम करताहेत, हे कौतुकास्पद आहे.त्यामुळे गावातील मुलभुत समस्या सुटण्यास मदत होते.यापुढील काळात विविध विकासकामांसाठी निधीची आवश्यकता असल्यास तो निधी उपलब्ध करून देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार असे आश्वासन आमदार सुनील शेळके यांनी दिले आहे.

या भूमिपूजन समारंभप्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेस मावळ तालुकाध्यक्षा सौ.दिपालीताई गराडे, कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्षा सौ.सारीका शेळके, चांदखेड अध्यक्षा सौ.पुनमताई बावकर, सरपंच सौ.अश्विनीताई सुभाष येवले, उपसरपंच लक्ष्मण येवले, सदस्य सौ.नेहाताई येवले, सौ.नीताताई येवले, सौ.सारिकाताई शिंदे, सौ.सुशीलाताई सावंत, सौ. सुनिताताई येवले, सौ. ज्योतीताई येवले, महेंद्र येवले, माजी सरपंच मनोज येवले,छबन महाराज कडु, ज्ञानेश्वर येवले,श्रीकांत जाधव, बिबाताई कदम, रंजनाताई कदम, अश्विनीताई साठे, पोलीस पाटील किसन येवले, मा.उपसरपंच जालिंदर पशाले, विष्णु येवले, मा.तंटामुक्ती अध्यक्ष गणेश मराठे, खंडु सातव, मा.व्हा.चेअरमन अरुण रेणुसे, विठ्ठल येवले, अजिंक्य टिळे,कल्पेश मराठे,गोरख हिंगे,सागर बोडके, माऊली पशाले आदि.मान्यवर, आजी-माजी पदाधिकारी, महिला भगिनी व ग्रामस्थ उपस्थित होते.