Wednesday, June 7, 2023
Homeपुणेमावळजांभूळ फाटा येथे टेम्पो दुचाकीवर पलटी होऊन भीषण अपघात ,एकजण गंभीर...

जांभूळ फाटा येथे टेम्पो दुचाकीवर पलटी होऊन भीषण अपघात ,एकजण गंभीर…

मावळ : जुन्या मुंबई पुणे महामार्गावर जांभूळ फाटा येथे टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो दुचाकीवर उलटून भीषण अपघात झाला यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला. सकाळी साडेनऊच्या सुमारास झालेल्या हा अपघात झाला असून . या अपघातात दुचाकीस्वार छबिनाथ चव्हाण ( वय 49, रा . तळेगाव दाभाडे , ता . मावळ , जि . पुणे ) हा गंभीर जखमी झाला आहे . तर टेम्पो चालक सिद्धार्थ अशोक कांबळे ( रा . थेरगाव पुणे ) याच्यावर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वडगाव मावळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , जुन्या मुंबई – पुणे महामार्गावर वडगाव जवळील जांभूळ फाटा येथे पुण्याहून लोणावळ्याच्या दिशेने एक टेम्पो बांधकाम साहित्य घेऊन जात होता . यावेळी टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटले व दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात टेम्पो दोनदा पलटी झाला . तर पुढे स्प्लेंडर गाडीवरून जाणाऱ्या दुचाकीला धडक बसली व दुचाकीस्वार टेम्पो खाली अडकला गेला .

त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली आहे . त्याला स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले . त्याच्यावर कामशेत येथील महावीर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे . या दरम्यान महामार्गावर सुमारे 5 किलोमीटरपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने वाहतूक ठप्प झाली होती . याप्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार सचिन काळे करीत आहेत .

You cannot copy content of this page