if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
लोणावळा(प्रतिनिधी):जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ लोणावळा डायमंड आणि तालेबतुल मुनेनात व मीरा महिला बहुउद्देशीय संस्था यांनी गृहनिर्माण संस्थांमधून टाकाऊ प्लास्टिक कचरा संकलन केला, वृक्षारोपण केले व घरोघरी कापडी पिशव्या आणि रोपांचे वाटप करत जागतिक पर्यावरण दिन उत्सहात साजरा केला.
या अंतर्गत शहरातील गृह निर्माण संस्थांमध्ये जाऊन टाकवू कचरा संकलन केला. तेथील रहिवाशांना प्लॅस्टिक वापरण्याचे तोटे समजावून सांगितले.पावसाळा जवळ आल्याने रेन वॉटर हार्वेस्टिंगचे फायदे सांगितले,वृक्षारोपण केले.घरोघरी कापडी पिशव्या आणि रोपांचे वाटप करण्यात आले.
यावेळी लायन्स क्लब ऑफ डायमंड अध्यक्ष अनंता गायकवाड,सचिव अनंता पडळे, खजिनदार तस्नीम थसरावाला, राजेश अग्रवाल, दाऊद थसरावाला,अब्दुल कादिर खंडालावाला,सुनीता गायकवाड,वंदना अग्रवाल, सकीना लखनंद, मिरा महिला बहुद्देशीय संस्थेच्या रेषमा शेख व सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.