Saturday, October 1, 2022
Homeपुणेलोणावळाजागतिक महिला दिनानिमित्त लोणावळ्यात मसाला प्रशिक्षणाचे मोफत आयोजन...

जागतिक महिला दिनानिमित्त लोणावळ्यात मसाला प्रशिक्षणाचे मोफत आयोजन…

लोणावळा : जागतिक महिला दिनानिमित्त मिरा महिला संस्था व महिला मंडळ लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मसाल्यांचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले.

8 मार्च रोजी सर्वत्र जगभरात महिला दिन साजरा होत आहे. आजचा दिवस प्रत्येक महिलेसाठी सन्मानाचा, अभिमानाचा अन् आनंदाचा दिवस आहे. आणि तो असणारच…. कारण आज अनेक ठिकाणी कर्तृत्ववान महिलांचे सत्कार होतात, पुरस्कार दिले जातात, महिलांच्या कार्याची दखल घेत सन्मान केला जातो, असा हा महिला दिन दरवर्षी आनंदात, उत्साहात साजरा केला जातो.

या महिला दिनाचे औचित्य साधत मीरा महिला संस्था व महिला मंडळ लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मसाला प्रशिक्षणाचे मोफत आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणास लोणावळा परिसरातील असंख्य महिला व तरुणनींनी उपस्थित राहून लाभ घेतला. हे प्रशिक्षण संपल्यानंतर मीरा महिला संस्थेच्या प्रशिक्षणार्थिंना प्रमाण पत्र प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती मीरा महिला संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा रेश्मा शेख यांनी दिली.

- Advertisment -

You cannot copy content of this page