Tuesday, May 30, 2023
Homeपुणेलोणावळाजागतिक महिला दिनानिमित्त मिरा महिला बहूउद्देशीय संस्थेकडून मसाले प्रशिक्षणाचे आयोजन…

जागतिक महिला दिनानिमित्त मिरा महिला बहूउद्देशीय संस्थेकडून मसाले प्रशिक्षणाचे आयोजन…

लोणावळा (प्रतिनिधी):जागतिक महिला दिनानिमित्त मिरा महिला बहूउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका रेश्मा शेख यांच्या संकल्पनेतून महिला भगिनींसाठी एक दिवसीय विविध मसाले तयार करण्याच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
मिरा महिला बहूउद्देशीय संस्थेकडून महिलांच्या सक्ष्मीकरणासाठी वेळोवेळी जसे होतील तसे प्रयत्न करण्यात येत आहेत. महिलांनी स्वतःच्या पायावर उभे रहावे, आपल्या परपंच्यासाठी घरगुती व्यवसाय करून हातभार लावावा यासाठी मिरा महिला बहूउद्देशीय संस्थेकडून अगरबत्ती, पर्फ्यूम, मेणबत्ती, मसाले, मेहंदी कोर्स यांसारख्या अनेक घरगुती व्यवसायांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
आणि या प्रशिक्षणाचा यावेळी जवळजवळ दोनशे ते अडीचशे महिला भगीनींनी मसाले प्रशिक्षणाचा लाभ घेत जागतिक महिला दिन उत्सहात साजरा केला.यावेळी महिला बहूउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका रेश्मा शेख यांसह सर्व प्रशिक्षिका आणि महिला भगिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page