भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) आजच्या युगात ” एक महिलाच दुसऱ्या महिलांसाठी ” त्यांच्या समस्या जाणून न्याय देवू शकत असल्याने महिलांच अखंडित संघटन करून कर्जत तालुक्यातील पळसदरी हद्दीत अध्यक्षा ॲड . पूजा सुर्वे ” राजमाता जिजाऊ फाऊंडेशन ” च्या माध्यमातून अहोरात्र तन मन धन अर्पण करून कार्य करत आहेत . गेली सहा वर्षे त्यांचे हे अविरत कार्य सुरू असून ” महिलांचे सक्षमीकरण ” करून त्यांना स्वताच्या पायावर उभे करून प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत आहेत . आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी ” राजमाता जिजाऊ फाउंडेशन ” मार्फ़त संस्थापक अध्यक्षा ॲड. पूजा सुर्वे यानी पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व बचत गटाच्या महिलांचा मेळावा आयोजित केला होता . या मेळाव्यात व्याख्यान , मनोरंजनाचे कार्यक्रम , स्नेहभोजन , सत्कार समारंभ असे कार्यक्रम संपन्न झाले . यांत जवळपास ७६ महिलानी या कार्यक्रमात सहभाग घेतला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले . बचत गटातील सर्व उपस्थित महिलांना मृदुला गड़नीस मॅडम यानी स्त्री जन्मा पासून स्त्री ची वेगवेगल्या रूपातील नाती याचे यथार्थ वर्णन केले , अणि स्त्रियांचे समाज जिवनातील महत्त्वाचे स्थान समजावून सांगितले. सदर मेळाव्यात महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
चूल आणि मुल तर कौटुंबिक जबाबदारी पार पाडून स्वतःसाठी जगणे हा मूळ हेतू साधून ” एक दिवस स्वतःसाठी ” म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे नियोजनात लीना कोषे मॅडम यांनी उत्कृष्ठ सूत्र संचालन करत महिलांचा उत्साह द्विगुणित केला , यामुळे सर्वांच्याच चेह-यावर हसू दिसत होते.
या कार्यक्रमाचे आयोजन राजमाता जिजाऊ फाऊंडेशन मार्फत केल्याने सर्वत्र अध्यक्षा ऍड . पूजा सुर्वे यांचे कौतुक होत आहे . या कार्याक्रमात महिलांसाठी स्नेहभोजनाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बचत गटातील सर्व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या सर्व महिलांचा यावेळी सत्कार देखील करण्यात आला . हा मेळावा यशस्वी करण्यासाठी श्री. प्रताप सुर्वे , श्री. श्रीरंग दरेकर , श्री. काशिनाथ पवार श्री. सदा आहेर , प्रतिक सुर्वे , दिव्यांशु , श्री सूदाम आव्हाड , राहुल निगुड़कर , श्री उदय दरेकर यांनी मोलाची मदत व सहकार्य केले . यावेळी अध्यक्षा सौ. पूजा सुर्वे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.