Friday, June 9, 2023
Homeपुणेलोणावळाजागतिक मानवता दिना निमित्त लोकमान्य टिळक विद्यालय नांगरगाव येथे देणगी व शैक्षणिक...

जागतिक मानवता दिना निमित्त लोकमान्य टिळक विद्यालय नांगरगाव येथे देणगी व शैक्षणिक साहित्य वाटप..

लोणावळा (प्रतिनिधी): जागतिक मानवता दिना निमित्त नांगरगाव येथील लोकमान्य टिळक विद्यालय शाळा क्र.8 येथे देणगी व शैक्षणिक वस्तूंचे वाटप करून जागतिक मानवता दिन उत्सहात साजरा करण्यात आला.
लोणावळा शहर शिवसेना संघटक सुभाष डेनकर आणि सौ. वसुंधरा नितीन दुर्गे यांच्या वतीने मानव अधिकार संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत दि.10 डिसेंबर रोजी हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी मानव अधिकार संघटनेचे महाराष्ट्र राज्य निरीक्षक सांडील सर यांनी विध्यार्थ्यांना जागतिक मानवता दिना बद्दल मार्गदर्शन करत संबोधित केले.

यावेळी मानव अधिकार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रमोद केसरकर, कोषाध्यक्ष रामराव नवघन, निरीक्षक रामदास खोत, सचिव राकेश शिंदे, पिंपरी चिंचवड अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड,महाराष्ट्र राज्य प्रवक्ता सौ. लत्ता नय्यर, मावळ तालुका उपाध्यक्ष नितीन दुर्गे, कार्याध्यक्ष उस्मान इनामदार, लोणावळा शहर अध्यक्ष संदीप कांबळे, उपाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, सचिव विनोद भोसले, सह सचिव सदानंद शेलार, कार्याध्यक्ष संजय कांबळे, निरीक्षक प्रदीप सोनारीकर, सह. प्रवक्ता एकनाथ भिवडे, संघटक विक्रांत ओव्हाळ, सह. संघटक अभिजित धांडोरे, ऍडव्होकेट अरविंद गौतरणे महिला उपाध्यक्ष सौ. तुलसी परमार, संघटक सौ. अनिता गोणते,सौ.सुरेखा केदारी तसेच सदस्य सुरज कांबळे, गीता पंडित, विमल चव्हाण, स्मिता कांबळे, सुखबाई राठोड, काजल धांडोरे, मीनाक्षी कांबळे आदीजन उपस्थित होते.
शालेय विध्यार्थांसाठी सामाजिक उपक्रम राबवत खऱ्या अर्थाने विध्यार्थ्यांना मानवता दिनाचे महत्व पटवून दिल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यपिका व सहकारी यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत व आभार मानले.

You cannot copy content of this page