![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(!empty($image5)); {?>
![]()
} ?>
कार्ला (प्रतिनिधी):जागरूक पालक सुदृढ बालक अभियान अंतर्गत देवघर गावात शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले.देवघर गावातील स्वर्गीय वामनराव हैबतराव देशमुख माध्यमिक विद्यालय देवघर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र कार्ला व उपकेंद्र देवघर यांच्यातर्फे इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या जागरूक पालक सदृढ बालक अभियान अंतर्गत आरोग्य तपासणी करण्यात आली.या आरोग्य शिबिरात 180 विद्यार्थ्यांनी सहभाग आपला नोंदवला. शिबिरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कार्ला वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन पवार, डॉ. पूजा कुंभार, दीपिका मुकादम, अनुराधा शिंदे, उषा आहेर, आशा वाळूंज, सेव चिल्ड्रन संस्थेच्या सोनम राणे,अक्षदा लायगुडे यांनी आरोग्य तपासणी केली.
विद्यालयाचे मुख्याध्यापक बी बी पाटील, शिक्षक मनीषा ठीकेकर, प्रवीणकुमार हुलावळे,विजय गायकवाड, विजय कचरे,भगवंत क्षिरसागर, अनिल पटेकर, सुरेश देशमुख, शंकर सिनकर, दीपक देशमुख,सचिन देशमुख यांच्या उपस्थितीत आरोग्य शिबिर संपन्न झाले.
डॉक्टर चेतन पवार यांनी आरोग्य शिबिराचा उद्देश सांगताना आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून हे अभियान साकारले असल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या मनोगतात केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण कुमार हुलवळे यांनी केले तर आभार भगवंत क्षीरसागर यांनी मानले.