![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(!empty($image5)); {?>
![]()
} ?>
लोणावळा (प्रतिनिधी): क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व जिल्हा क्रीडा परिषद जळगाव द्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय ताईक्वादो क्रीडा स्पर्धेत लोणावळ्यातील कु. आदित्य राजेंद्र मोरे याने घवघवीत यश संपादन करून पुणे विभागात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण पदक जिंकले आहे.
क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व जिल्हा क्रीडा परिषद जळगाव यांच्या विद्यमाने राज्यस्तरीय शालेयतायक्वांदो क्रीडा स्पर्धा 2022-2023 चे आयोजन श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुल, जळगाव येथे करण्यात आले होते.
राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो क्रिडा स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक शालेय विध्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.यात 19 वर्षाखालील वयोगटात लोणावळ्यातील व्ही. पी. एस. हायस्कुल आणि डी.पी.मेहता ज्युनियर कॉलेजमधील कु.आदित्य राजेंद्र मोरे याने 55 ते 59 किलो वजनी गटात संपूर्ण पुणे विभागात प्रथम क्रमांकावर यश संपादन करत सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला आहे.
आदित्य याने मिळविलेल्या यशाबद्दल जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित व क्रीडा व युवक सेवा नाशिक विभागाच्या उपसंचालिका यांच्या हस्ते विशेष प्राविण्य प्रमाणपत्र व सुवर्ण पदक देऊन गौरविण्यात आले.आदित्य याच्या प्राविण्याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
आदित्य राजेंद्र मोरे सद्या मावळ तालुका तायक्वांदो असोसिएशन संस्थेत मास्टर विक्रम बा. बोभाटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मास्टर डेवीड सर, मास्टर कुमार सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.मावळ तालुका तायक्वांदो असोसिएशनचे कार्याध्यक्ष गणेश दत्तात्रय गवळी, उपाध्यक्ष अमोल गायकवाड, सक्रेटरी हर्षल होगले,जाकिर खलिफा,शाळेचे मुख्याध्यपक व शालेय शिक्षक यांनी आदित्य मोरे याचे अभिनंदन केले तसेच पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.