Thursday, September 28, 2023
Homeपुणेजिल्ह्यात 18 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत निवडणूक होणार...

जिल्ह्यात 18 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत निवडणूक होणार…

पुणे (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत 2022/23 वर्षाची ग्रामपंचायत पदासाठी निवडणूक जाहीर झाली असून पुणे जिल्ह्यात येत्या 18 सप्टेंबर रोजी ही निवडणूक पार पडणार आहे . पुणे जिल्ह्यात सध्या 61 ग्रामपंचायतची निवडणूक पार पडणार आहे . तर या 61 सरपंच पदासाठी 212 जण मैदानात उतरले आहेत . एकूण 315 अर्ज सरपंच पदासाठी आले होते. मात्र त्यातील 103 जणांनी माघार घेतली आहे.तर दुसरीकडे 485 सदस्य पदासाठी 696 उमेदवार रिंगणात उतरले आहेत . 18 सप्टेंबर रोजी यासाठीची निवडणूक होणार असून 19 सप्टेंबरला मतमोजणी जाहीर केली जाणार आहे .

राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार यावर्षी सरपंच पदाची निवडणूक थेट होणार आहे . त्यानुसार जिल्ह्यातील 315 उमेदवारांनी सरपंच पदासाठी अर्ज केला होता . मंगळवार हा उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता . त्यानुसार 103 जणांनी आपले अर्ज मागे घेतले . आणि शेवटी 212 उमेदवार रिंगणात उतरले आहेत .

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 1166 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे . काही ठिकाणी 13 तर काही ठिकाणी 18 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. पुणे जिल्ह्यातील बारपे बुद्रुक आणि चांदखेड या दोन ग्रामपंचायतीची निवडणूक 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

- Advertisment -