Thursday, June 1, 2023
Homeपुणेमावळजुन्या भांडणाच्या रागातून चायनीज चालकावर कोयत्याने वार, मावळातील घटना..

जुन्या भांडणाच्या रागातून चायनीज चालकावर कोयत्याने वार, मावळातील घटना..

मावळ (प्रतिनिधी): वडगांव मावळ येथील नागाथली येथे जुन्या भांडणाच्या रागातून चायनीज सेंटर चालकावर कोयत्याने वार केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवार दि.1 रोजी दुपारी 3:00 वा. च्या सुमारास घडला आहे. या हल्ल्यात चायनीज सेंटर चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पवना हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत.
संदीप ज्ञानेश्वर तिकोणे ( वय २८ , रा . नागाथली ता . मावळ ) असे गंभीर जखमी झालेल्या चायनीज चालकाचे नाव आहे.याप्रकरणी तिकोणे यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर फिर्यादे नुसार आरोपी गणेश गणपत शिंदे ( रा . नागाथली , ता . मावळ ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी हे त्यांच्या हिंदवी चायनीज सेंटरमध्ये जेवण बनवत असताना दोन दिवसापुर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन आरोपी गणेश शिंदे याने हातातील लोखंडी कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात पाठीमागुन वार केले . फिर्यादीला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला . या घटनेचा पुढील तपास स.पो.नि जाधव हे करत आहे.

You cannot copy content of this page