Tuesday, June 6, 2023
Homeपुणेदेहूरोडजेष्ठ नागरिकाकडून महिलेवर लैंगिक अत्याचार, देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

जेष्ठ नागरिकाकडून महिलेवर लैंगिक अत्याचार, देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

देहूरोड (प्रतिनिधी): महिलेच्या वधु – वर सूचक केंद्रात येऊन तिच्याशी ओळख निर्माण करत तिला आयुष्यभर सांभाळण्याचे आमिष दाखवून 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार चार वर्षांपासून सप्टेंबर 2022 या कालावधीत देहूरोड परिसरात घडला .
सतीश अग्रवाल ( वय 65 , रा . मेन बाजार देहूरोड ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे . याप्रकरणी 43 वर्षीय महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी महिलेने वधु वर सूचक मंडळ सुरु करण्यासाठी घोरावडेश्वर मंदिराच्या पायथ्याला एक व्यावसायिक गाळा भाड्याने घेतला होता . तिथे आरोपीचे येणे – जाणे होत असे . त्यातूनच दोघांची ओळख झाली . आरोपीने फिर्यादीला आयुष्यभर सांभाळण्याचे त्यांच्या मुलाला नोकरी लावण्याचे आमिष दाखवले . त्या अमिषातून त्याने महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केला असल्याचे फिर्यादेत नमूद केले आहे. पुढील तपास देहूरोड पोलीस करत आहेत.

You cannot copy content of this page