Friday, December 8, 2023
Homeपुणेलोणावळाजेष्ठ पत्रकार गोपीनाथ मानकर यांचे निधन…

जेष्ठ पत्रकार गोपीनाथ मानकर यांचे निधन…

लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळा शहर पत्रकार संघाचे ज्येष्ठ सदस्य गोपीनाथ मानकर यांचे आज सकाळी अकस्मात निधन झाले.
मागील अनेक वर्ष त्यांनी लोणावळा शहरात पत्रकार म्हणुन काम केले.साधारण दोन दशकांपुर्वी त्यांनी विविध साप्ताहिकांमध्ये काम केले होते. मुंबई व पुणे भागातील अनेक ज्येष्ठ पत्रकारांसोबत तत्यांचे चांगले संबंध होते.मागील एक ते दीड दशकापासून ते लोणावळा तलाठी कार्यालयात नागरिकांना मदतनीस म्हणून काम करत होते.
मागील आठवडाभरापासून ते काहिसे आजारी होते. आज सकाळी लोणावळा तलाठी कार्यालया बाहेर त्यांनी देह सोडला. आज दुपारी दोन वाजता लोणावळ्यातील कैलास नगर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
- Advertisment -

You cannot copy content of this page