लोणावळा : जोशाबा मजूर कष्टकरी संघटना (म,राज्य) यांच्या वतीने आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज लोणावळा शहरामध्ये, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला.या जयंती महोत्सवाचे अध्यक्ष शांताबाई वाधमारे ह्या होत्या.
आदिवासी समाजालाही महात्मा फुले , बाबासाहेब कळावे ह्या उद्देशाने आदिवासी समाजाच्या महीलाची निवड करण्यात आली.आज दुनिया चंद्रावर चाललीय पण आम्ही मजुरच का असा प्रश्न संघटनेचे अध्यक्ष अंकुश चव्हाण यांनी उपस्थित केला ,ह्याचे कारण फक्त शिक्षण हेच आहे,आणि तेच मजुरांना समजावे ह्याच उद्देशाने हा सोहळा साजरा करत आहोत असे आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
या वेळी तालुक्यातील दहा विद्यमान सरपंच उपसरपंच यांचा संविधानाची प्रत देऊन सन्मान करण्यात आला , तसेच मावळचा सुपुत्र अर्णव अमोल ओव्हाळ (४७ वजनी गट) याने मध्ये प्रदेश, उज्जैन येथे झालेल्या अंतर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवल्या बदल मा रमेश भाऊ साळवे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौविण्यात आले , तसेच लोणावळा खंडाळा या पर्यटन ठिकाणी युवकांना रोजगार निर्माण करून दिल्या बदल चालक मालक संघटनेचे अध्यक्ष मां संजय मारुती मावकर यांचेही सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला, या वेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष मां रमेश भाऊ साळवे, महाराष्ट्राचे नेते अरुण भिंगरदिवे, अप्पासाहेब गायकवाड,मंगलताई सोनवणे, जयश्री ताई गायकवाड, प्रविंजी पवार टाटा धरणग्रस्त संगर्ष समितीचे अध्यक्ष मधुकर भालेराव आर पी आय जयंती महोत्सव अध्यक्ष अनिल वाघमारे आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी , अंकुश चव्हाण अध्यक्ष जोशाबा ,नामदेव राठोड ,सागर साबळे, चंद्रकांत ओव्हाळ,किशोर वंजारी ,जे के गरड ,लक्ष्मण राठोड ,अनिल भालेराव,अरुण कांबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला,,,या वेळी तालुक्यातून अनेक पक्ष संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.