Friday, June 9, 2023
Homeपुणेमावळटाकवे खुर्द कालभैरवनाथ उत्सवानिमित्त भव्य छकडी स्पर्धेचे आयोजन…

टाकवे खुर्द कालभैरवनाथ उत्सवानिमित्त भव्य छकडी स्पर्धेचे आयोजन…

मावळ (प्रतिनिधी):श्री काळभैरवनाथ देवाचा उत्सव व हनुमान जयंती निमित्त भव्य छकडी स्पर्धा टाकवे खुर्द येथे पार पडल्या यामध्ये एकुण 130 छकडी मालकांनी सहभाग घेतला होता यामध्ये घाटाचा राजा हा मान सुर्यकांत शेठ शेलार व प्रदिप शेठ शेलार यांचा गाडा 15 सेकंद 13 मीली मध्ये धावला तसेच प्रथम क्रमांकाचा मान किरण मारुती गायखे व स्वामी गायकवाड यांचा 14 सेकंद 76 मी ली दुसरा क्रमांक सुर्यकांत शेठ शेलार व प्रदिप शेठ शेलार यांचा गाडा 14 सेकंद 98 मीली मध्ये धावला तिसरा क्रमांक किसनराव बच्चे तुंगार्ली, दिनेश धोंडू शिंदे व सोमनाथ आहेर जुगलबंदी यांचा 15 सेकंद 23 मीली चौथ्या क्रमांकाचे मानकरी ठरले. सिध्देश तापकीर नेले मुळशी यांचा गाडा 15 सेकंद 24 मीली मध्ये धावला.
श्री कालभैरवनाथ व हनुमान जयंती उत्सवानिमित्त आदल्या दिवशी 5 रोजी समाजप्रबोधनकार ह.भ.प. कृष्णा महाराज राऊत (जालना) यांचे कीर्तन झाले.6 रोजी सकाळी अभिषेक, पूजा झाल्यानंतर बैलगाडा शर्यत आणि संध्याकाळी भंडाऱ्याचा कार्यक्रम झाला. यात्रा अतिशय सुंदर व आनंदोत्सवात पार पडली.
ग्रामस्थ आणि आलेल्या सर्वांसाठी महाप्रसाद ही टाकवे खुर्द यात्रेची खासीयत बनली आहे. त्यासोबतच छकडीस्वारांचा सन्मान ही संकल्पना प्रथमतः येथे राबवली. बाहेरून आलेल्या सर्व भाविकांनी, गाडा मालक, गाडा शौकिनांनी आणि पाहुण्यांनी यात्रेचे तोंडभरून कौतुक केले.

You cannot copy content of this page