Thursday, June 1, 2023
Homeपुणेमावळटाकवे बुद्रुक सोसायटी वर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व कायम..

टाकवे बुद्रुक सोसायटी वर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व कायम..

टाकवे बुद्रुक : टाकवे विविध कार्यकारी सोसायटीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वर्चस्व कायम राखत पाडुरंग मोढवे यांना चेअरमन पदी तर जितेंद्र परदेशी यांना व्हाईस चेअरमन पदाची संधी दिली .

चेअरमन पदासाठी दोन अर्ज दाखल करण्यात आले होते . यामध्ये दत्ता असवले यांना तीन मते तर पांडुरंग मोढवे यांना 9 मते मिळवून विजयी झाले . तर व्हाईस चेअरमन पदासाठी जितेंद्र परदेशी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध करण्यात आली . यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राकेश निखारे यांनी तर सहाय्यक म्हणून मदन अडिवळे यांनी काम पाहिले .

यावेळी माजी मंत्री मदन बाफना , आमदार सुनील शेळके राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे , राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष मारुती असवले , सरपंच भुषण असवले , उपसरपंच परशुराम मालपोटे , आंदर मावळ अध्यक्ष सचिन असवले , उद्योजक अनिल मालपोटे , सदस्य सोमनाथ असवले यांनी नवनिर्वाचित चेअरमन व्हा . चेअरमन व संचालकांना पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन सन्मान करत शुभेच्छा दिल्या . यावेळी सोसायटीचे संचालक शिवाजी असवले , विलास मालपोटे , योगेश गायकवाड , जालिंदर मालपोटे , तानाजी गुणाट , सुप्रिया मालपोटे उपस्थित होते .

You cannot copy content of this page