लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी स्वतः पथकासह आतवण गावच्या हद्दीतील टायगर पॉईंट या पर्यटन स्थळावर दि .11 रोजी पहाटे 3:00 वा .च्या सुमारास वेळेचे निर्बंध न पाळता 7 टपरी व्यवसायीकांनी आपला व्यवसाय चालू ठेवल्यामूळे त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 33 (W ) अंतर्गत गुन्हा दाखल करत कारवाई केली.
तसेच सदर ठिकाणी गोंधळ करून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या 14 पर्यटकांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 33(W)अंतर्गत कारवाई करण्यात आली तर दारु पिवून वाहन चालविणाऱ्या एका वाहन चालका विरुद्ध मुंबई दारुबंदी कायदयांतर्गत गुन्हा दाखल करत कारवाई करण्यात आली आहे .
यापुढेही सदर ठिकाणी व्यवसाय करणारे व्यवसायीकांनी वेळेचे निर्बंध पाळून आपला व्यवसाय करावा . पर्यटनाकरीता आलेल्या पर्यटकांनी कोणत्याही प्रकारे गोंधळ गोंगाट करुन सार्वजनीक शांतता भंग करु नये व कोणीही दारुचे सेवण करुन वाहन चालवू नये असे आवाहन लोणावळा उपविभागीय सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी केले आहे.
सदरची कारवाई ही लोणावळा उपविभागीय सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांच्यासह त्यांचे पथक आणि लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ , सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने , पोलीस अंमलदार नितेश कवडे , धनवे , गायकवाड, प्रवीण उकिर्डे , पंचरास , पंडीत यांनी केली आहे.